राहुल शर्मानं असीनला ६ कोटींची अंगठी देऊन केलं प्रपोज?

बॉलिवूड अभिनेत्री असीनला तिचा प्रियकर राहुल शर्मानं जवळपास ६ कोटींची अंगठी गिफ्ट केल्याची बातमी आहे. 

Updated: Sep 14, 2015, 06:35 PM IST
राहुल शर्मानं असीनला ६ कोटींची अंगठी देऊन केलं प्रपोज? title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री असीनला तिचा प्रियकर राहुल शर्मानं जवळपास ६ कोटींची अंगठी गिफ्ट केल्याची बातमी आहे. 

नवभारत टाइम्सच्या वेबसाइटनुसार बिझनेसमन राहुल शर्मानं जवळपास एका वर्षापूर्वी असीनला बॉलिवूड स्टाइलमध्ये प्रपोज केलं आणि गिफ्ट दिलं. वेबसाइटचं म्हणणं आहे की, ही अंगठी खास करून असिनसाठी राहुलनं बेल्जियमहून इंपोर्ट केली होती.

आणखी वाचा - अभिनेत्री आसिन लवकरच चढणार बोहल्यावर, अक्षय कुमारने जमवलं लग्न!

रिपोर्टनुसार राहुलनं असीनला २० कॅरेटचं सॉलिटेयर गिफ्ट केलं. याची किंमत सहा कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार लवकरच हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने असीन आणि राहुलची भेट घडवली होती. यानंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लवकरच ते लग्न करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.