बाहुबली -2 सिनेमाने इतिहास घडवलाय

बाहुबली द कनक्लुजन या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर न भूतो भविष्यती इतिहास घडवला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2017, 04:24 PM IST
बाहुबली -2 सिनेमाने इतिहास घडवलाय title=

मुंबई : बाहुबली द कनक्लुजन या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर न भूतो भविष्यती इतिहास घडवला आहे. 

या सिनेमाने पहिल्या आठवड्यातच  वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर तब्बल 800  कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे 800 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणारा बाहुबली 2 हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.

पहिल्या आठवड्याच्या बाबतीत बाहुबलीने सलमानच्या सुलतान आणि आमिरच्या दंगलचा रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबलीने दंगल आणि पीके या सिनेमांचा ऑलटाईम ग्रॉसिंगचाही विक्रम मोडला आहे.

त्यामुळे  बॉक्स ऑफिसवर बाहुबली अजून कोणत्या नव्या विक्रमांना गवसणी घालतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.