मुंबई : अभिनेता सलमान खानला याला हिट अॅण्ड रन प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने बॉलिवूडला फटका बसला आहे. तब्बल २५० कोटी रुपयांचे चित्रपटांचे भवितव्य अधांतरी असणार आहे.
सलमानची सध्या करिअरमध्ये चलती होती. त्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तब्बल २५० कोटींचे चित्रपट त्याच्याकडे होते. मात्र, सलमानला शिक्षा झाल्याने अनेक मोठ्या निर्मात्यांना चित्रपट पूर्ण कसे होणार याची चिंता लागली आहे.
करिना कपूरसोबतचा 'बजरंगी भाईजान' आणि सोनम कपूरसोबतचा 'प्रेम रतन धन पायो' या सलमानच्या दोन मोठ्या चित्रपटांचे चित्रिकरण सुरु होते. नुकतेच सलमानने 'बजरंगी भाईजान' चित्रपटासाठी काश्मीरमध्ये चित्रिकरण झाले. याचबरोबर करण जोहरच्या 'शुद्धी' चित्रपटासाठी सलमान खानने १५० कोटी रुपयांची ऑफरची डिमांड केल्याचे बोलले जाते.
तसचे सलमानकडे आणखी नव्याने चार चित्रपटाची यादी होती. यात 'दबंग-३', 'एण्ट्री मैं नो एण्ट्री' या चित्रपटांचा समावेश होता. मात्र, सलमानला शिक्षा झाल्याने बॉलिवूडला मोठा फटका बसलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.