'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शकाला ह्रदयविकाराचा झटका

सलमान खान संबधीत 'हिट अॅन्ड रन' केसच्या निकालापूर्वीच 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान यांना ह्रदयविकारचा झटका आल्याची माहिती आहे.

Updated: May 6, 2015, 02:12 PM IST
'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शकाला ह्रदयविकाराचा झटका title=

श्रीनगर: सलमान खान संबधीत 'हिट अॅन्ड रन' केसच्या निकालापूर्वीच 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान यांना ह्रदयविकारचा झटका आल्याची माहिती आहे.

ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर कबीर खान यांना दिल्लीला आणण्यात आलं. तेथे त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

कबीर जम्मू काश्मीरमध्ये सलमानसोबत शूटिंगमध्ये सहभागी होते. सोमवारी रात्री त्यांना ह्रदयविकारचा झटका आला. २००२च्या 'हिट अॅन्ड रन' केसच्या सुनावणीसाठी सलमान मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाला होता. 'बजरंगी भाईजान' सिनेमात सलमान मुख्य भूमिकेत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.