नवी दिल्ली : सलमान खानची दत्तक बहिण अर्पिता हिचं शाही लग्न खूपच चर्चेत आहे. हैदराबादच्या फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडलं... इथं पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात अर्पित दिल्लीचा व्यापारी असलेल्या आयुष शर्मा याच्यासोबत विवाहबंधनात अडकलीय. अर्पिता आणि आयुष यांचं लग्न यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा सेलिब्रिटी उत्सव असल्याचं म्हटलं जातंय.
सलमानचं आपल्या लहान बहिणीवर असलेलं प्रेम वादातीत आहे... आणि खान कुटुंबीयही आयुषला पसंत करतात. यामुळेच, सलमाननं आपल्या बहिणीचं लग्न एक मोठा इव्हेंट बनविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ‘भाई हो तो ऐसा’ असंच यामुळे सलमानला शाब्बासकी मिळतेय.
४८ वर्षीय सलमाननं हा आपल्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहेच... तर मग तो बहिणीला तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या आणि गोड प्रसंगी गिफ्ट देण्यात तरी कसा काय मागे पडेल... या दबंग अभिनेत्यानं नव विवाहित दाम्पत्याला एका महागडी ‘रोल्स रॉयस फँटम’ गाडी भेट म्हणून दिल्याचं सांगितलं जातंय.
काही दिवसांपूर्वी, सलमाननं आपल्या बहिणीला १६ करोड रुपये किंमतीचा एक सुपर थ्री बीएचके अपार्टमेंट भेट म्हणून दिल्याचं म्हटलं जात होतं. त्यात आता एका महागड्या गाजीचाही समावेश झालाय. या सफेद रोल्स रॉयस गाडीची किंमत आहे तब्बत चार करोड रुपये...
सलमाननं बहिणीच्या पाठवणीच्या वेळी भावूक क्षणांत नव विवाहित दाम्पत्याकडे या गाडीची चावी सोपवली... ही भेट अर्पितासाठीही अविस्मरणीय ठरली असेल यात शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.