अमिताभ, प्रियांका 'अतुल्य भारत'चे ब्रँड अॅम्बेसिडेर

केंद्र सरकारच्या अतुल्य भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडेरपदी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आलीये. 

Updated: Jan 21, 2016, 03:37 PM IST
अमिताभ, प्रियांका 'अतुल्य भारत'चे ब्रँड अॅम्बेसिडेर title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 'अतुल्य भारत' अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडेरपदी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आलीये. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल्य भारत अभियानासाठी अमिताभ आणि प्रियांका यांच्या नावाची घोषणा २६ जानेवारीनंतर केली जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही कलाकारांसोबत पर्यटन मंत्रालय करार करेल. या अभियानासाठी दोघांनीही मानधन घेतले नसल्याचीही माहिती मिळत आहे. 

अमिताभ बच्चन पुरुष ब्रँड अॅम्बेसिडेर तर प्रियांका महिला ब्रँड अॅम्बेसिडेर असेल. दोघांचीही तीन वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल. 

काही दिवसांपूर्वीच आमिर खानला अतुल्य भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडेरपदावरुन हटवण्यात आले. असहिष्णुताप्रकरणी विधानानंतर आमिरला हटवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र सरकार हे विधान फेटाळून लावलंय.