Amitabh Bachchan post for Aaradhya : नुकतंच धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं. गुरुवारी झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनात अनेक सेलिब्रिटी दिसले. हे सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना चीअर करण्यासाठी तिथे पोहोचले होते. त्यावेळी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन देखील त्यांची मुलगी आराध्याला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचले होते. या दोघांसोबत यावेळी आराध्याचे आजोबा अर्थात अमिताभ बच्चन देखील पोहोचले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनानंतर अमिताभ यांनी घरी जाताच त्यांना आराध्याचा परफॉर्मन्स कसा वाटला त्याशिवाय त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. या पोस्टमध्ये त्यांनी आराध्यानं या वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेतल्यानं त्यांच्यासाठी हा खूप चांगला आणि उत्साहपूर्ण क्षण होता.
शुक्रवारी शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात आराध्याच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेण्याविषयी सांगितले. अमिताभ यांनी सांगितलं की 'मुलं ही त्यांच्यात असलेला साधेपणा आणि आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी प्रयत्न करतात... सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की ते हजारो लोकांसोबत तुमच्यासाठी परफॉर्म करतात. तर हा सगळ्यात उस्ताह वाढवणारा अनुभव असतो. आजचा दिवसं असाच होता. एक दिवस आराम केल्यानंतर उद्या पुन्हा कामावर परतनार आहे. पण काहीही झालं तरी काम थांबायला नको आणि त्यासाठीच भविष्यात काम करण्यासाठी लागणारं संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. आता शिकण्याची वेळ संपली.
बच्चन कुटुंबाशिवाय शाळेतील कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज पोहोचले होते. शाहरुख खान हा त्याची पत्नी गौरी खान आणि लेक सुहाना खानसोबत मुलगा अबराम खानला चीयर करण्यासाठी पोहोचले होते. अबराम आणि आराध्यानं एकत्र एका नाटकात काम केलं. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील त्यांची मुलं मीशा आणि जैनला चीयर करण्यासाठी पोहोचले होते. यांच्याशिवाय आणखी काही सेलिब्रिटी कपलचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात करीना कपूर खान आणि सैफ अली खान देखील पोहोचले होते.
हेही वाचा : चाहत्यांच्या प्रतीक्षेची परिसीमा! 9 जानेवारीला OTT वर 'पुष्पा 2' प्रदर्शित होणार की नाही?
धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन हे दोन दिवसांचं होतं. 21 डिसेंबर रोजी या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ऐश्वर्या राय आणि तिच्या आईनं हजेरी लावली होती.