राजस्थानमधील नागौरमधील बिकानेर रोडवर गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एक एसयूव्ही कार होंडा एजन्सीसमोर तब्बल 8 वेळा पलटली आणि नंतर गेट तोडून कार आतमध्ये निघून गेली. धक्कादायक बाब म्हणजे गाडीत 5 व्यक्ती होते आणि एक व्यक्ती गाडी पलटताच बाहेर पडला. इतर 4 गाडीतच होते. विचित्र बाब म्हणजे पाचही व्यक्ती बाहेर येऊन 'भाई, चहा पाजा' असं म्हणून लागले. हायवेवर झालेल्या या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नागौर शहरातील बिकानेर रोडवर एक वेगवान एसयूव्ही 8 वेळा उलटली. एकदा वळताना, गाडीने पेट घेतल्यासारखे वाटले, कारण वळताना ज्वाला उठल्या. या अपघातातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे कोणालाही साथ खरचटलं देखील नाही, एवढेच नाही तर सर्वजण एक-एक करून होंडा मधून स्वतः बाहेर आले.
नागौर-बीकानेर राष्ट्रीय राजमार्ग पर एक कैंपर गाड़ी आठ बार पलटी लेकिन उसमें सवार पांच लोगों के खरोंच तक नहीं आई.
देखिए घटना का सीसीटीवी फुटेज,जो चमत्कार से कम नहीं है.#Nagaur #accidente #AIart #Christmas #SAvPAK #SupermanMovie
CCTV pic.twitter.com/rQCroy3c7J— Balmukund Joshi (@balmukundjoshi) December 20, 2024
ही संपूर्ण घटना शुक्रवारी सकाळी घडली, ज्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की एक एसयूव्ही नागौरहून बिकानेरच्या दिशेने जात होती. दरम्यान, होंडा एजन्सी गाडीचे नियंत्रण सुटून ते पलटी होऊ लागले. पलटी होत असताना नागौरच्या होंडा एजन्सीच्या गेटवर वाहन पलटी झाल्याने गेट तुटले. आठव्यांदा गाडी गेटवर उलटली आणि थांबली. यादरम्यान कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने उडी मारली आणि तो बाहेर पडला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत आतील लोक सुरक्षित असतील अशी आशा फार कमी होती, पण पुढे जे घडले तो खरोखरच चमत्कार आहे.
एवढा भीषण अपघात झाल्यावर आतील माणसांची काळजी वाटते. पण गाडीमधील पाचही व्यक्तींना एकही जखम झाली नाही. उलट ते बाहेर आल्यावर चहा मिळेल का? असा प्रश्न करु लागले. अपघातानंतर एसयूव्हीमधील एक व्यक्ती आधीच बाहेर उडी मारली होती. सगळ्यात आधी तो उठला आणि एजन्सीच्या दिशेने निघाला. यानंतर एक एक करून आणखी चार जण गाडीतून बाहेर आले. एजन्सीमध्ये काम करणाऱ्या सचिन ओझा यांनी सांगितले की, कोणालाही दुखापत झाली नाही आणि आत येताच त्यांनी चहा घेण्यास सांगितले, एकंदरीत हायस्पीड एसयूव्ही 8 वेळा उलटली तरी कोणालाही ओरखडाही आला नाही.