न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...

India News : बापरे! पोलिसांना तपासातून मिळाली भलतीच माहिती... एकदा नव्हे, तर दोनदा घडला हा प्रकार. पाहा काय आहे नेमकं प्रकरण...   

सायली पाटील | Updated: Dec 21, 2024, 10:52 AM IST
न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...  title=
india Mumbai news NCLT attack video conference network hacked to obscene videos played in court room

India News : मागील काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून, सामान्यच नव्हे, तर अगदी सरकारी कामजही याच्या विळख्यात येताना दिसत आहे. नुकत्याच घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नुकतंच National Company Law Tribunal (NCLT) अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या सुनावणीदरम्यान अचानकच स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला आणि एकच खळबळ माजली. 

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 12 आणि 17 डिसेंबर या दोन दिवशी हॅकरकडून या प्राधिकरणाचं संकेतस्थळ आणि संपूर्ण वेब प्रणाली हॅक करत व्हिडीओ चालवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सदर प्रकरणावरील तक्रारीनंतर शुक्रवारी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एनसीएलटीचे डेप्युटी रजिस्ट्रार चरण प्रताप सिंह यांनी ही तक्रार केली होती. 

वेब प्रणाली हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता 12 डिसेंबर रोजी हॅकरनं दुपारी 1 वाजून 8 मिनिटांपासून 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत अश्लील व्हिडीओ सुरू केला. तर, 17 तारखेला दुपारी 2.05 मिनिटांपासून पुढील 11 मिनिटं त्याच नावावरून न्यायालयात दिसणाऱ्या स्क्रीनवर ही अश्लील ध्वनीफित चालवण्यात आल्याची बाब समोर आली. 

हेसुद्धा वाचा : Kalyan attack marathi family : 'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड 

न्यायालयीन वेबसाईटशी फेरफार करत हॅकरनं कोर्ट 4 आणि कोर्ट 5 च्या स्क्रीनवर हे व्हिडीओ चालवत न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. संबंधित प्रकरणी कफ परेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.