‘एअरलिफ्ट’च्या दुसऱ्या ट्रेलरला १० लाख हिट्स

 अभिनेता अक्षयकुमारचा आगामी सिनेमा ‘एअरलिफ्ट’चा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. एका दिवसातच या ट्रेलरला १० लाख हिट्स मिळाले आहे.

Updated: Jan 3, 2016, 09:29 PM IST
‘एअरलिफ्ट’च्या दुसऱ्या ट्रेलरला १० लाख हिट्स title=

मुंबई : अभिनेता अक्षयकुमारचा आगामी सिनेमा ‘एअरलिफ्ट’चा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. एका दिवसातच या ट्रेलरला १० लाख हिट्स मिळाले आहे.

राजा कृष्णा मेनन चित्रपटाचे दिग्दर्शक असून अक्षयसोबत अभिनेत्री निमरत कौर मुख्य भूमिकेत आहे.1990-91 च्या सुमारास इराक-कुवेत युद्धांची झळ पोहचलेल्या कुवेतमधल्या भारतीयांवर हा सिनेमा बनवला आहे.

एअरलिफ्टचं पोस्टर यापूर्वी लाँच करण्यात आलं होतं. त्यावर ‘170000 शरणार्थी, 488 विमानं, 59 दिवस, एक माणूस’ अशी टॅगलाईन होती. 22 जानेवारी 2016 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडिओ