शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा

आज करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमासोबतच अजय देवगणचा शिवाय हा सिनेमा रिलीज झालाय. बोलो हर..हर..हर..हर असं या सिनेमाचं समीक्षण करण्याआधीही म्हणावं लागेल कारण रियल लाइफमधल्या शिव भक्त अजय देवगणची भक्ती शिवाय या सिनेमात त्यानं दाखवून दिलीच आहे, त्याचबरोबर शिवाय हा सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्सचा बॅलॅन्स पहायला मिळतो. 

Updated: Oct 28, 2016, 11:30 AM IST
शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा  title=

मुंबई : आज करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमासोबतच अजय देवगणचा शिवाय हा सिनेमा रिलीज झालाय. बोलो हर..हर..हर..हर असं या सिनेमाचं समीक्षण करण्याआधीही म्हणावं लागेल कारण रियल लाइफमधल्या शिव भक्त अजय देवगणची भक्ती शिवाय या सिनेमात त्यानं दाखवून दिलीच आहे, त्याचबरोबर शिवाय हा सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्सचा बॅलॅन्स पहायला मिळतो. 

सिनेमाची कथा

ही गोष्ट आहे शिवाय या तरुणाची ज्याचं कुणीच नाही, तो एकटा राहतो, त्यामुले फॅमिली म्हणजे काय, याची जाण त्याला नाही. एके दिवशी त्याची भेट ओल्गाशी होते. ओल्गा बल्गेरियामध्ये राहणारी मुलगी आहे जी शिक्षणासाठी भारतात येते. शिवायच्या प्रेमात ती पडते. पुढे त्यांना मुलगी होते. ओल्गाला बाळ नको असतं केवळ शिवायच्या हट्टापोटी ती बाळाला जन्म देते. शिवायला ते सुपूर्द करुन ती कायमची भारत सोडून निघून जाते. पुढे जेव्हा शिवायची मुलगी गौरा मोठी होते तेव्हा तिला हे सत्य कळंतं. मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी शिवाय तिला बल्गेरियामध्ये तिच्या आईला भेटण्यासाठी घेऊन जातो. बरं मी आता जेवढं बोलली ते सगळं केवळ बॅकग्राउंड होतं. खरी स्टोरीतर बल्गेरियामध्ये गेल्यावर सुरु होते.. या पुढची स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल. इन शॉर्ट सिनेमाविषयी सांगायचं झालं तर हा सिनेमा वडिल मुलीच्या सुंदर नात्यावर आधारित आहे. ज्यात भरपूर इमोशन्स आहेत आणि भरपूर ्अॅक्शनही आहे. चाईल्ड ट्रॅफिकींग सारखा विषय सिनेमात हाताळण्यात आलाय.

अजय देवगणनं साकारलेला शिवाय चांगला झालाय, त्याच्या भूमिकेला त्यानं पूर्ण न्याय दिलाय. मात्र सिनेमाचं दिग्दर्शन जे देखील अजयनंच केलंय, जरा फसलंय. सिनेमाची गोष्ट अप्रतिम आहे, वेगळी आहे, पण त्याची मांडणी हवी तितकी परिणामकारक होऊ शकली नाही. वीर दास सारख्या चांगल्या नटाचा वापर, सिनेमात त्याला करता आला नाहीये. सिनेमाचे लोकेश्न्स, कॅमेरावर्क, व्हिएफएक्स कमाल आहेत, जबरदस्त आहेत. तांत्रिकदृष्ट्या सिनेमात बरेच वेगळे प्रयोग करण्यात आलेत, जे याआधी आपण कुठल्या बॉलीवूड सिनेमात पहिले नसतील. 

कलाकारांचा चोख अभिनय

अभिनेत्री सायेशा सेहगल, एरिका कार, बाल कलाकार एबिगेल एम्स सारख्याया फ्रेश चेह-यांमुळे सिनेमाला आणखी फ्रेश लूक मिळतो. या कलाकारांनी आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. 

अजय देवगण हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे, त्यानं अभिनय सोडून उगाचच सिनेमा दिग्दर्शनमध्ये पडू नये. या आधीही यू मी और हम सारखा सिनेमा त्यानं दिग्दर्शित केला होता. ज्याचे आफ्टरइफेक्टसही ही त्यानं भोगलेत. आता शिवायसोबतही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय. शिवाय या सिनेमातले अॅक्शन सीन्स, व्हीएफएक्स आणि लोकेशन्स सोडले तर काहीच लक्षात राहत नाही. सिनेमाच्या मांडणी प्रमाणेच सिनेमाचा स्क्रिनप्लेही फसलाय. 

शिवायचं संगीत छान झालं. संगीतकार मिथुन यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. सिनेमाचा बॅकग्राउंड स्कोर सिनेमाची स्ट्रेन्थ आहे. बोलो हर हर हर.. हे गाणं सिनेमाच्या अॅक्शन सीन्सला एकदम फीट बसलंय. दरखास्त, रातें ही गाणी छान झालीयेत. 

शिवाय या सिनेमाचं बजेट साधारण 100 कोटींच्या आसपास आहे. त्यात ऐ दिल है मुश्किल सारखा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. शिवायला या सिनेमाकडून जबरदस्त टक्कर मिळेल यात शंका नाही. तेव्हा ज्यांना भरपूर अॅक्शन पहायला आवडतं, विशेष करुन जे अजय देवगणचे चाहते आहेत, अशा चाहत्यांसाठी शिवाय हा सिनेमा एकदा पहायला हरकत नाही. 

किती स्टार्स

शिवायचे हे सगळे फॅक्टर्स पाहता शिवाय सिनेमाला मिळतायत 2.5 स्टार्स.