पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट ही पाकिस्तानमध्ये गेल्याची बातमी पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजनं दिली आहे.

Updated: Oct 27, 2016, 11:21 PM IST
पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये  title=

कराची : बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट ही पाकिस्तानमध्ये गेल्याची बातमी पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजनं दिली आहे. पूजा भट वैयक्तिक कारणासाठी गुरुवारी पाकिस्तानला आल्याचा दावाही जिओ न्यूजनं केला आहे. पण पाकिस्तान फॅशन वीकमध्ये भाग घेण्यासाठी पूजा कराचीमध्ये आल्याचाही चर्चा आहेत.

अनेक वेळा मी पाकिस्तानला आली आहे. पाकिस्तानमध्ये आल्यामुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया पूजा भटनं दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरु आहे, मग कलाकारांवरच बंदी का असा सवालही पूजा भटनं उपस्थित केला आहे.