पाकिस्तानला चर्चमध्ये आत्मघाती स्फोट, १० ठार, ५० जखमी

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील योहानाबाद भागात आज दुपारी एका चर्चला लक्ष्य करून करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १० जण ठार, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Updated: Mar 15, 2015, 04:41 PM IST
 पाकिस्तानला चर्चमध्ये आत्मघाती स्फोट, १० ठार, ५० जखमी title=

लाहोर: पाकिस्तानमधील लाहोर शहरातील योहानाबाद भागात आज दुपारी एका चर्चला लक्ष्य करून करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १० जण ठार, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, योहानाबाद भागात असलेलं रोमन कॅथोलिक आणि ख्रिस्त चर्चला लक्ष्य करून हे आत्मघाती स्फोट करण्यात आले. स्फोटात १० नागरिक ठार झाले आहेत. जखमींची संख्या अधिक असल्यानं मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश अधिक आहे. जखमींना लाहोर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चर्च आहेत. सुमारे दहा लाख नागरिक इथं वास्तव्यास आहेत. 

पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करण्यात येतं. दरम्यान, तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.