प्राण्यांचं मांस खाल्याने १० पट अधिक कर्करोगाची शक्यता

डुक्कर, बैल, गाय आणि  इतर काही प्राण्याच्या मांसाचं सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपानापेक्षाही 10 पट जास्त असल्याचा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघानं दिलाय. 

Updated: Oct 27, 2015, 04:21 PM IST
प्राण्यांचं मांस खाल्याने १० पट अधिक कर्करोगाची शक्यता title=

मुंबई : डुक्कर, बैल, गाय आणि  इतर काही प्राण्याच्या मांसाचं सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपानापेक्षाही 10 पट जास्त असल्याचा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघानं दिलाय. 

आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधऩ समितीनं नुकताच हा अहवाल जागतिक आरोग्य संघाकडे सोपवला. प्रक्रिया केलेलं मांस आणि गोमांस या दोन प्रकराच्या मांसावर गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या संशोधनातून हा मुद्दा पुढे आलाय. 

आपल्या देशात सध्या सुरू असलेल्या गोमांसावरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघाचा हा अहवाल महत्वाचा मानला जातोय.. 

दरम्यान अहवालानुसार दररोज 50 ग्रॅम प्रक्रिया केलेलं मांस किंवा रेडमीट खाल्ल्यास कर्करोग होण्याची शक्यता तब्बल 18 टक्के वाढते. त्यामुळे जगभरात याविषयी जागरुकता वाढणवण्याची गरजी जागतिक आरोग्य संघानं व्यक्त केलीय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.