बाली : इंडियाचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियात अटक करण्यात आली. मूळचा मुंबईचा राहणारा 55 वर्षीय माफिया डॉनचे मूळचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दोन दशकांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या छोटा राजनला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा एजन्सींनी शनिवारी दुपारी छोटा राजन याचा एक फोन कॉल टॅप केला, त्यात त्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितले. की ऑस्ट्रेलियात मला खूप असुरक्षित वाटते. त्यामुळे तो लवकरच या ठिकाणाहून निघून जाण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर सुरक्षा एजन्सींनी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले.
रविवारी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडून भारतीय अधिकाऱ्यांना माहिती मिळते की, राजेंद्र सदाशिव निकाळजे हा भारतीय पासपोर्ट क्रमांक G 9273860 ने गरुडा एअरलाइन्सने बालीला रवाना झाला आहे. ही माहिती मिळाली तेव्हा विमान सिडनीला पोहचले होते.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी लगेच इंटरपोलमार्फत बाली इमिग्रेशन डिपार्टमेंटला सूचना दिली. माहिती मिळाल्यावर एअरपोर्ट अधिकारींनी त्वरित कारवाई केली आणि इमिग्रेशन आणि बाली पोलिसांनी विमान लँड झाल्यावर राजनला पकडले.
पासपोर्टमधील नाव आणि पकडलेल्या व्यक्ती एकच असल्याचं समजलं. त्यानंतर लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर भारताचा मोस्ट वॉन्टेंड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. जो 22 वर्षांपासून फरार आहे.
इंडोनेशिया पकडलेला छोटा राजनच - राम शिंदे
केंद्र सरकाराची चौकशी झाल्यानंतर राज्य सरकार छोटा राजनचा ताबा घेईल. इंडोनेशियात पकडलेली व्यक्ती ही छोटा राजन असल्याचा दुजोरा ही गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी दिलाय. याआधीच राज्य सरकारने केंद्र सरकार आणि सीबीआयला अनेकदा सर्व कागदपत्रे पुरवण्यात आलेत. त्यामुळे छोटा राजनवर खटले चालवण्या करता खूप मदत होणार अाहे.
छोटा राजनला भारतात आणण्याकरता सीबीआयची टीम रवाना झाल्याचे ही गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.