फोन टॅपिंग प्रकरण : अमेरिका वठणीवर!

‘फोनवरील संभाषणासंबंधी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल’ असं आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलंय. त्यावर सहमती दर्शवत ‘याचं गोष्टीसाठी ठोस कायदा अस्तित्वात यावा’ अशी मागणी युरोपियन संघाने केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 18, 2014, 10:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ब्रसेल्स
‘फोनवरील संभाषणासंबंधी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल’ असं आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलंय. त्यावर सहमती दर्शवत ‘याचं गोष्टीसाठी ठोस कायदा अस्तित्वात यावा’ अशी मागणी युरोपियन संघाने केलीय.
ओबामांनी काल अमेरीकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या फोनवरील संभाषणावर देखरेख ठेवण्याच्या अधिकारांचं स्वरूप मर्यादित केलं. एडवर्ड स्नोडेनने केलेल्या गौप्य स्फोटामुळे निर्माण झालेल्या गदारोळाला शांत करताना मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांचे फोन टॅपिंग अमेरीकेकडून थांबवण्यात येत आहे.
दहशतवादाशी लढताना व्यापक स्वरुपात आकडेवारी गोळा करत रहावं लागेल, अस ओबामांनी मत व्यक्त केलं. युरोपियन संघाचे न्यायाधीश विवियाने रेडिंग यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचा फायदा अमेरिकेशिवाय इतर देशांतील नागरिकांना होईल, आपण ओबामांशी सहमत असून भविष्यात यासंदर्भात जास्त काम करावं लागेल, असा आशावाद व्यक्त केलाय.
अमेरीकेने ब्रिटनच्या ‘जीसीएचक्यु’च्या (गुप्तचर यंत्रणा) साथीनं ऑनलाईन आणि फोनवरील संभाषणावर हेरगिरी करत असल्याचा खुलासा एडवर्ड स्नोडेननं केला होता. त्यानंतर अमेरीकेला आंतरराष्ट्रीय रोष ओढावून घ्यावा लागला होता.

जर्मनीनंही केलं स्वागत
आपल्या फोन संभाषणावर लक्ष ठेवल्यामुळे जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल नाराज होत्या. त्यामुळे, गुप्तचर यंत्रणेकडून केली जाणारी हेरगिरी थांबवण्याच्या ओबामांच्या आश्वासनाचे जर्मनीने स्वागत केले आहे. आपल्या खाजगी जीवनात अमेरीकेकडून पाळत ठेवल्यामुळे जर्मन लोक चिंतित होते, जनहितासाठी मित्रराष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणामध्ये सहकार्य राहील, असे जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टिफन सायबर्ट यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.