www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे. या कारणाने आता खाजगीत बोलताना जरा सावधान राहिलेलंच बरं राहणार आहे. नाही तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.
हा लॅम्प अमेरिकेतील शहरात काही ठिकाणी बसवल्याची माहिती मॅकडोनाल्ड आणि ब्रायन यांनी दिली आहे. या लॅम्पद्वारे आजूबाजूचा कोणताही आवाज रेकॉर्ड केला जाऊ शकतो. लोकांच्या खाजगी आयुष्यात या लॅम्पमुळे सार्वजनिक जीवनात व्यत्यय येऊ शकल्याने मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस यांच्या आक्षेप घेतला जाऊ शकतो.
मॅकडोनाल्ड आणि हाऊस या दोघांनी हेरगिरी करणारे लॅम्प अमेरिकेत कोणत्या सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत, हे सांगितले नाही. या उपकरणाचा बेकायदा वापर होऊ शकतो. त्यामुळे उपकरणाचा गैरवापर टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.