मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....

 आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी  अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 17, 2017, 04:49 PM IST
 मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर.... title=

नवी दिल्ली :  आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी  अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो. 

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार, भारताला वाटते की आपल्याला एसएसजीमध्ये सदस्यता मिळावी यासाठी रशिया प्रयत्न करीत नाही. या प्रकरणी रशिया बेफिकरीची भूमिका घेत आहे. तर दुसरीकडे रशियाच्यामते भारत या मुद्द्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अण्विक रिअॅक्टरसंबंधी कराराला विलंब करीत आहे. 
  
रशियाचे पंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती, त्यावेळी या करारावर चर्चा झाली होती. पण मोदी यांनी यावर अद्याप काहीही स्पष्ट संकेत दिलेले नाही. 

पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन याची भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीपूर्वी रशिया आण्विक कराराला अंतीम रूप मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे.