नवी दिल्ली : मेंदुला मार लागल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येवू शकतं का याचं संशोधन सध्या सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक डॉक्टर हिमांशु बंसल यांना याबाबत परवानगी देखील मिळाली आहे. ते २० मृत्यू झालेल्या लोकांवर याचं परिक्षण करणार आहे.
या परिक्षणात केंद्रीय स्थानातील काही घटकांना पूर्नजिवीत करता येऊ शकतं की नाही हे पाहण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग केला जाणार आहे. कोमामध्ये गेलेला व्यक्ती पुन्हा सामान्य रुपाय कसा आणता येऊ शकतो यासाठी ही हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलेल्या व्यक्तींवर प्रयोग केला जाणार आहे.