ब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू

बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. 

Updated: Jun 28, 2015, 12:02 PM IST
ब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू title=

लंडन : बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. 

 
लगेच त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली. हॉस्पिटलच्या त्या बेडला फुलांनी सजवल गेलं. आपल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एमीनही लागलीच होकार दिला. दोघांच्याही परिवाराच्या संमतीने हॉस्पिटलच्या त्या बेडवरच त्यांचं लग्न झालं. यावेळी संपू्र्ण हॉस्पिटल सजवण्यात आलं होतं. एमीनही गुलाबी रंगाचे कपडे घातले होते.
 
हॉस्पिटलमधल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थीतीत हे लग्न पार पडलं. लग्नानंतर तीन दिवसात त्याचा मृत्यू झालाय. गेल्या वर्षभरापासून ओमार आजारी होता. ऑक्टोवरमध्ये त्याची तब्येत सुधारली होती. 
 
ओमारच्या आईने मुलगा गमावल्याच्या दु:खासोबत एमीसारखी सून मिळाल्याचा आनंदही असल्याचे सांगितलंय. एमी ओमारच्या आजारपणात नेहमीच त्याच्यासोबत रहायची असंही त्यांनी सांगितलंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.