बलुच नेत्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिलाय. याचं पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या बलुच नेत्यांनी स्वागत केलंय. सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेले बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रहुमदाघ बुग्ती यांनी मोदींचे जाहीर आभार मानलेत. 

Updated: Aug 16, 2016, 11:12 AM IST
बलुच नेत्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिलाय. याचं पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या बलुच नेत्यांनी स्वागत केलंय. सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेले बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रहुमदाघ बुग्ती यांनी मोदींचे जाहीर आभार मानलेत. 

लंडनस्थित बलूच नागरिकांनीही मोदींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान सरकार करत असलेल्या अन्यायांना वाचा फुटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीये. पाकिस्तानचं खरं रुप जगानं ओळखलंय असा जोरदार टोलाही मोदींनी हाणला आहे. पेशावरच्या हल्ल्याच्या वेळी सगळा भारत हळहळला. पण पाकिस्तानच्या बाजूनं बुरहान वानीच्या एन्काऊंटर नंतर काळा दिवस साजरा होतो. याला काय म्हणायचं? असा प्रश्न यावेळी मोदींनी विचारला.