पाकिस्तानची कोल्हेकुई; काश्मीर प्रश्नी चर्चेचं आमंत्रण

पाकिस्तानची कोल्हेकुई पुन्हा सुरू झाली आहे. काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने भारताला आमंत्रण पाठवलं आहे. 

Updated: Aug 15, 2016, 10:56 PM IST
 पाकिस्तानची कोल्हेकुई; काश्मीर प्रश्नी चर्चेचं आमंत्रण title=

इस्लामाबाद : पाकिस्तानची कोल्हेकुई पुन्हा सुरू झाली आहे. काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने भारताला आमंत्रण पाठवलं आहे. 

पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी पुन्हा ढवळाढवळ करण्यास सुरूवात केली होती. याच महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या सार्क परिषदेत देखील राजनाथ सिंह यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानचा वाढत चाललेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा उचलला होता. 

भारताने याआधीच काश्मीर विषयी चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. जर चर्चा करायची असेल तर ती भारत पाकिस्तान संबधावर केली जाईल असेही भारताने ठणकावून सांगितले होते.

काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तानां पत्राद्वारे चर्चेचे आमंत्रण पाठवले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझिज चौधरी यांनी भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना चर्चेसाठी पत्र पाठवले आहे.

जम्मू-काश्मीरच्या विषयावर परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानमध्ये येऊन चर्चा करावी असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान नवाज शरिफ यांचे पराराष्ट्र सल्लागार सरताज अझिज यांच्या वक्तव्यानंतर हे निमंत्रण भारताकडे आले आहे.  

पाकिस्तान हा भारताला काश्मीरप्रश्नी चर्चेसाठी निमंत्रण देणार आहे असे वक्तव्य गेल्याच आठड्यात  त्यांनी केले होते.