स्यू की यांच्या नव्या पर्वाला सुरुवात

विरोधी पक्षनेत्या आँग सान स्यू की यांनी म्यानमारच्या संसदेत बुधवारी शपथ घेतली. आता खऱ्या अर्थाने स्यू की यांच्या संसदेतील प्रवेशाने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

Updated: May 3, 2012, 03:32 PM IST

www.24taas.com , नेपितॉ

 

विरोधी पक्षनेत्या आँग सान स्यू की यांनी म्यानमारच्या संसदेत बुधवारी शपथ घेतली. आता खऱ्या अर्थाने स्यू की यांच्या संसदेतील प्रवेशाने एका नव्या पर्वाला सुरुवात  झाली आहे.

 

 

स्यू की यांचा तेथील हुकूमशाही व्यवस्थेला विरोध होता . पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर स्यू की यांनी सार्वजनिक आयुष्याला सन्मानाने सुरुवात केली . स्यू की यांचा शपथविधी राजधानी नेपितॉ येथे पार पडला. स्यू की ६६ वर्षांच्या असून , त्यांच्या कायदेमंडळातील प्रवेशाने म्यानमारमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे .साइन यांचे सरकार सुधारणावादी सरकार म्हणून ओळखले जाते .

 

 

गेल्या वर्षी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. स्यू की यांचा ' नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी ' पक्ष आणि अध्यक्ष थाइन साइन यांच्या सत्ताधारी पक्षातील संबंध कसे राहतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे. स्यू की यांच्या संसदेतील प्रवेशाने एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असली , तरी त्यांच्या पक्षाचे संसदेतील बळ अल्प आहे . तरीही विरोधी पक्षाच्या उपस्थितीमुळे सध्याच्या सरकारला वैधानिक दर्जा मिळण्याचीही शक्यता आहे