www.24taas.com, लंडन
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला एक मोठा झटका बसला आहे. दाऊदचा विश्वासू साथीदार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी टायगर मेमन याला भारताच्या हवाली करण्याचे आदेश लंडन कोर्टानं दिले आहेत. टायगरला मार्च २०१० मध्ये एका प्रकरणात लंडन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून मेमनच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली होती.
लंडन कोर्टानं भारताची ही मागणी मान्य करीत टायगर हनिफ मेमन याला भारताच्या हवाली करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानं भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती मोठं यश लागलं आहे. तर दाऊदच्या साम्राज्याला हा मोठा धक्का मानला जातो आहे. एक प्रकारे भारताला खूप मोठ ं यश लाभलं आहे. गुजरात बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप टायगर मेमन याच्यावर ठेवण्यात आला आहे.
टायगर मेननचं संपूर्ण नेटवर्क हे गुजरातमधून चालतं. तसेच त्याचे लश्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचेही म्हटंले जाते. ४९ वर्षीय टायगर हनीफ मेनन ह्याचं प्रत्यार्पण आता शक्य होणार आहे. टायगर मेनन उर्फ उमरजी पटेलला लंडनच्या स्कॉटलंड पोलिसांनी १६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून भारत त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करीत होता.