बेल्जिअम गोळीबारात पाच ठार, १२२ जखमी

बेल्जिअम शहरातील सेंट्रल स्केअर मार्केटमध्ये एकाने तीन हँड ग्रेनेड फेकून, गोळीबार केल्याने पाच जण ठार आणि १२२ जण जखमी झाले. दरम्यान हल्लेखाराला ठार करण्यात आले आहे.

Updated: Dec 16, 2011, 03:36 AM IST

झी २४ तास वेब टीम, लिजी

बेल्जिअम शहरातील सेंट्रल स्केअर मार्केटमध्ये एकाने तीन हँड ग्रेनेड फेकून, गोळीबार केल्याने पाच जण ठार आणि १२२ जण जखमी झाले. दरम्यान हल्लेखाराला ठार करण्यात आले आहे.

पोलिसांनी शस्त्रास्त्रे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तिला चौकशीसाठी थांबविले.यावेळी त्याने ग्रेनेड फेकले. एवढ्यावर तो न थांबता गोळीबार केला. मंगळवारी ख्रिसमस जवळ आल्याने अनेक शाळांना सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक मार्केटमध्ये उपस्थित होते. त्यावेळी या हल्लेखोराने गोळीबार केला.  हल्ला करणाऱ्या या व्यक्तीला ठार मारण्यात आले आहे.

पोलिसांनी या हल्लेखाराची ओळख पटली असून, त्याचे नाव नॉर्डीन अमराणी (३३) असे असून तो लिजीतील रहिवासी आहे. दरम्यान बेल्जियमचे पंतप्रधानांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले आहे.  पश्चिम युरोपात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारचा होणारा हा दुसरा हल्ला आहे.