नवी दिल्ली : रघुराम राजन यांच्या जागी आता उर्जित पटेल भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांची धुरा ते उर्जित पटेल आपल्या खांद्यावर घेतील.
4 सप्टेंबर रोजी रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपत आहे. उर्जित पटेल हे सध्या रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.