नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नोटबंदीचा खोचक प्रतिक्रिया

Updated: Dec 8, 2016, 03:28 PM IST
नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवसांची मुदत भारतीय जनतेकडे मागितली होती. त्यातले तीस दिवस गेले आहेत. आणखी वीस दिवस उरले आहेत. त्यामुळे तोपर्यंत वाट पाहू अशी खोचक प्रतिक्रिया, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत दिली आहे.

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय. देशाभरात दडलेला काळा पैसा बाहेर यावा या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून पाचशे आणि 1000च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती.

विरोधक या निर्णयाविरोधात आहेत. शिवसेनेने देखील या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे.