मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकरानं पाकिस्तानकडे किती वेळा मागणी केलीय याची मोजदाद आता उरलेली नाही. पण एक काळ असा होता, की दाऊद स्वतःहून भारतात येण्यास तयार होता..पण मगं घोडं अडलं कुठे? आपल्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता, असा खुलासाही पवारांनी केलाय.
एक अंडरवर्ल्डचा बादशाह (दाऊद)... दुसरा देशातल्या सर्वात कसलेला राजकारणी (शरद पवार) ... तिसरा देशातला सर्वात धूर्त वकील (राम जेठमलानी)
या तिघाचं एकमेकांशी काहीतरी कनेक्शन असेल, असं कुणाला स्वप्नातही वाटणार नाही. पण ज्येष्ठ वकील राम जेठमलानींनी केलेल्या एका गौप्यस्फोटानं इतिहासातल्या राज्यकर्त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांवर प्रकाश टाकलाय.
दाऊदला लंडनमध्ये भेटलो, त्यानं भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्याला पोलिसांची झंजट नको होती. पवारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं, असा गौप्यस्फोट कायदेतज्ज्ञ राम जेठमलमी यांनी केला होता.
खरंतरं शरद पवारांचं नाव अंडरवर्ल्ड शी जोडण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. याआधीच्या अशा प्रयत्नांकडे पवारांनी त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. पण खुद्द जेठमलांनींनी त्यांचं नाव घेतलं. त्यामुळे पवारांनाही त्याचं स्पटीकरण दिलं.
आपल्याकडे तसा प्रस्ताव आला होता. पण दाऊदला भारतात यायचं होतं पण तुरुंगात जायंचं नव्हतं... या त्याच्या अटी मान्य करण्यासारख्या नव्हत्या.
राजकराण्याच्या वरदहस्ताशिवाय गुन्हेरगारी जग फोफवू शक्त नाही. पण, डॉन इतका वाढला होता की परदेशात बसून अख्खी मुंबई चालवण्याची ताकद होती. पण मुंबईत राहून त्याला ते कराचयं होतं. पण तसं झालं मात्र नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.