नवी दिल्ली : बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलने व्यक्त केलेय. मात्र त्याचवेळी बहुमताचा आकडा थोडक्यात हुकण्याची शक्यता वर्तविलेय. या निवडणुकीतवर जोरदार सट्टा लागलाय. बिहार निवडणुकीवर ५ हजार कोटींचा सट्टा लागलाय.
बिहारमध्ये अखेरच्या टप्प्याचं मतदान संपलंय. एक्झिट पोलचे निकाल हाती येण्यापूर्वीच देशभरातल्या सट्टाबाजारानं NDAच्या पारड्यात आपलं मत टाकल्याचं चित्र आहे. बिहार निवडणुकीवर देशात तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा लागलाय.
NDAला बहुमत मिळणार असलं, तरी सत्तास्थापनेच्या जादुई आकड्यापासून मात्र लांब राहावं लागू शकतं, असं सट्टाबाजाराला वाटतंय. २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२३ आमदार असणं आवश्यक आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे. तर नितीश कुमारांचा जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर राहील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.