www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदी सरकारनं पहिल्याच दिवशी कारभार हाती घेताच रेल्वे बोर्डानं एक मोठा निर्णय घेतलाय.
रेल्वे बोर्डानं देशभरातल्या रेल्वे तिकीट सर्व्हिस एजेंट्सचे लायसन्स रद्द केलेत.
तिकीट विक्रीमधील काळाबाजार आणि गोंधळ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातला निर्णय प्रलंबित होता.
मात्र नवं सरकार आल्यानंतर त्यांनी लगेचच याबाबतचा निर्णय घेऊन टाकलाय.
लायसन्स रद्द केल्यामुळे तिकीटांमधील काळाबाजार मोठ्या प्रमाणात कमी होईल असा दावा रेल्वे बोर्डानं केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.