स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून वाद

स्मृती इराणींनी मानव मनुष्यबळ विकास मंत्री बनवण्यावरून वाद निर्माण झालाय.

Updated: May 28, 2014, 06:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्मृती इराणींनी मानव मनुष्यबळ विकास मंत्री बनवण्यावरून वाद निर्माण झालाय.
राज्यसभेच्या रेकॉर्डच्या माध्यमातून स्मृती इराणी ग्रॅज्युएटही नाही, मात्र त्या आता देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा कारभार सांभाळणार आहेत, टीका काँग्रेस सरचिटणीस अजय माकन यांनी ट्विटरवरून केलीय.
तर कायदामंत्री रवीशंकर प्रसाद स्मृती इराणी यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी स्मृती इराणींवर होणारी टीका दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे, तर उमा भारती यांनी सोनिया गांधी यांच्यावर बोट ठेवलं आहे, आणि म्हटलंय की, सोनियांनी एक तर आपल्या खासदारांना गप्प बसायला सांगावं, नाहीतर स्वत:चं शिक्षण किती झालं आहे, हे सर्वांना जाहीर सांगावं की, त्यांचं शिक्षण दहावीपर्यंतही झालेलं नाही.
स्मृती इराणी या ग्रॅज्युएट नाहीत हे आतापर्यंत समोर आलं असलं, तरी सोनिया गांधी यांचं शिक्षण किती झालं आहे, हे अजूनही समोर आलेलं नाही.
तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही त्यांचा बचाव केलाय. काँग्रेसच्या अशा तर्कावरून तर मग हवाई उड्डान मंत्र्यांनी विमानच उडवायला हवं, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.