`टॉम अॅण्ड जेरी`चा तंटा चर्चेनं सुटेल का?

प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपासाठी `टॉम अॅण्ड जेरी`सारखे भांडणारे, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण आज तरी चर्चेनं सुटेल का?, असा सवाल उपस्थित होतो.

Updated: Feb 10, 2014, 04:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपासाठी `टॉम अॅण्ड जेरी`सारखे भांडणारे, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण आज तरी चर्चेनं सुटेल का?, असा सवाल उपस्थित होतो.
कारण आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांची बैठक आज दिल्लीत होतेय.
काँग्रेसकडून ए. के. अँटोनी आणि अहमद पटेल तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे चर्चेत सहभागी होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26-22 हे जागावाटपाचे सूत्र कायम राहण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघांची अदलाबदली मात्र होणार आहे.
दरम्यान उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसचीही बैठक दिल्लीत होणार आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.