पंतप्रधान मोदींकडून इम्रान खानच्या अॅप्सचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान नावाच्या शिक्षकाचं आपल्या भाषणातून कौतूक केलं, इम्रान खान यांच्या घरी मीडियाच्या लोकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली आहे. केंद्र आणि राजस्थान सरकारने इम्रानचा सन्मान केला आहे.

Updated: Nov 15, 2015, 07:26 PM IST
पंतप्रधान मोदींकडून इम्रान खानच्या अॅप्सचे कौतुक title=

अलवर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान नावाच्या शिक्षकाचं आपल्या भाषणातून कौतूक केलं, इम्रान खान यांच्या घरी मीडियाच्या लोकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली आहे. केंद्र आणि राजस्थान सरकारने इम्रानचा सन्मान केला आहे.

केंद्रीय दूरसंचार आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इम्रान खानसोबत दहा मिनिटे चर्चा केली, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा यासाठी तयार केलेल्या अॅपविषयी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. बीएसएनएलने यानंतर इम्रानला आयुष्यभरासाठी डाटा कनेक्शन फ्री दिलं आहे. ही सेवा इम्रानच्या घरी सुरू झाली आहे.

इम्रान खानची ओळख
राजस्थानच्या अलवर शहरातील लक्ष्मीनगर भागात एका छोट्याशा घरात इम्रान खान नावाचे शिक्षक राहतात, त्यांचा जन्म १९७८ साली झाला. इम्रान यांचं जीवन त्यांच्या लहान भावाच्या छोट्याशा कम्प्युटरने बदलून टाकलं.

इम्रान यांनी अॅपच्या क्षेत्रात असं काही काम केलं की, त्यांना अलवर जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष पंडेणकर यांनी जिल्ह्याचा अॅप बनवण्याचं काम सोपवलं. तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष यांनी इम्रान यांना सांगितलं, तुम्ही वेबसाईट नाही तर अॅपवर काम करा, कारण हा अॅपचा जमाना आहे.

इम्रान म्हणतात, मी कधीही कम्प्यूटरचं प्राथमिक शिक्षण घेतलं नाही, मी सुरूवातीला कम्प्युटरवर गेम खेळत होतो, मात्र मी गुगलवर वेबसाईट बनवणे देखील शिकलो, गुगलवर सर्वकाही मिळतं, इम्रान यांनी प्राथमिक शिक्षणावर आधारीत आतापर्यंत ५२ अॅप तयार केले आहेत, हे अॅप जवळजवळ ३० लाख पेक्षा जास्त वेळेस डाऊन लोड झाले असल्याचा दावा इम्रानने केला आहे.

इम्रान शेतकऱ्याचा मुलगा
शेतकरी सुलेमान खान यांच्या चार मुलापैकी तीन नंबरच्या इम्रान यांनी प्राथमिक, स्पर्धा परीक्षा, एनसीईआरटीसाठी अॅप बनवले आहेत. इम्रान म्हणतात, सध्या इंग्रजी भाषेसाठी अनेक अॅप तयार करण्यात आले आहेत, पण स्थानिक भाषा, ग्रामीण क्षेत्रावर तसेच हिंदीत अॅप बनवण्यात आलेले नाहीत, मी हाच विचार करून हिंदीत अॅप बनवले आहेत. मी आतापर्यंत ५२ अॅप तयार केल्याचं इम्रान सांगतो. 

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांना काही दिवसांआधी इम्रानने आपले अॅप दाखवले होते. इम्रान म्हणतो, मी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण नाही ऐकलं, पण एका व्यक्तीने मला ही माहिती दिली, मी यू-ट्यूबवर पीएम मोदी यांचं भाषण ऐकलं, यानंतर मला भरपूर फोन आले, काही जण व्यक्तिगत भेट घेण्यासाठी देखील आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.