नवी दिल्ली : दिल्ली सरकारनं लागू केलेल्या सम-विषम नियमची आज खरी परीक्षा असणार आहे. दिल्लीतलं प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारनं रस्त्यावरच्या निम्म्या गाड्या कमी करण्याच्या उद्देशानं हे नवीन धोरण लागू केलंय.
एक तारखेपासून जरी धोरण लागू झालेलं असलं,लॉन्ग वीकेंडनंतर आज खऱ्या अर्थानं दिल्लीकर रस्त्यावर उतरणार आहेत. सरकारनं त्यांच्या सुविधेसाठी वाढीव मेट्रो आणि सार्वजनिक बसेस सोडण्याची तयारी केलीय.
त्यामुळे सरकारच्या उपाययोजना किती उपयोगी ठरतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलंय.