पठाणकोट : आज सलग तिसऱ्या दिवशी पठाणकोटच्या वायूसेना बेसवरची धुमश्चक्री सुरूच आहे. पंजाबमधल्या पठाणकोटच्या वायूसेना तळावर अजूनही दोन दहशतवादी लपले आहेत. त्यांना शोधण्यासाठी आज सकाळपासून पुन्हा एकदा एनएसजीच्या कमांडोंचं ऑपरेशन सुरु झालंय.
सकाळपासून एअरबेसवर हेलिकॉप्टरनं नजर ठेवली जातेय. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा गोळीबाराचेही आवाज येत आहेत. सरकारला या हल्ल्याची कल्पना असतानाही तो रोखता न आल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होतेय.
दरम्यान पंतप्रधानांच्या निवासस्थानी वरिष्ठ अधिका-यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे उपस्थित आहेत.