हैदराबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यात आले आहे. ओबामांसाठी शाल आणि मिसेस ओबामांसाठी सिल्कची साडी. विशेष म्हणजे प्युअर सुपरसिल्कची ही साडी एका मॅचबॉक्समध्ये घडी करून ठेवता येईल, एवढी तलम आहे.
६० ग्रॅम वजनाची ही साडी साडेचार मीटर लांब आहे. तेलंगणा राज्यातील सिरसिला भागातील नल्ला विजय या हातमाग कारागीरानं ही सिल्कची साडी तयार केलीय. प्रजासत्ताक दिनी बराक ओबामा भारतभेटीवर येत असून, त्यांना भेट देण्यासाठी ही साडी आणि शाल याआधीच पंतप्रधान कार्यालयात पाठवून देण्यात आली आहे.
ही साडी बनवण्यासाटी विजयला कुणीही आग्रह केला नव्हता. मात्र भारतभेटीवर येणाऱ्या अमेरिकन दाम्पत्याला गिफ्ट म्हणून ही सिल्क साडी देण्याचं विजयनं ठरवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.