नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला असून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाढत्या महागाईमुळं रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नसल्याचं दिसतं आहे.
तर दुसरीकडे पैसे काढण्यावरील मर्यादा हटवण्याचा मुहुर्त अखेर निघालाय. 13 मार्चपासून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नसल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे. ग्राहकांना 20 फेब्रवारीपासून 24 हजारांची मर्यादा हटवून आपल्या बचत खात्यातून 50 हजार रुपये काढता येणार आहेत. मात्र 13 मार्चपासून संपूर्ण मर्यादा हटवण्यात येणार आहे. त्यामुळं अजून दीड महिन्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर 9 नोव्हेंबरपासून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे