नेपाळमध्ये मृतांचा आकडा ५०५७

नेपाळमधील मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिलीय.

Updated: Apr 29, 2015, 08:07 AM IST
 नेपाळमध्ये मृतांचा आकडा ५०५७ title=

काठमांडू / नवी दिल्ली :  नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर आता मदत आणि बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत ढिगाऱ्याखालून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. एकूण मृतांची संख्या ५०५७ वर पोहचली आहे. नेपाळ सरकारने लावलेल्या अंदाजानुसार हा आकडा १५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. 

नेपाळमधली घोडातबेला या गावात भूस्खलन आणि हिमस्खलन यामुळे २५० जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार भूकंपात उद्धवस्थ झालेल्या घरांच्या निर्मितीसाठी भारत मदत करणार आहे. 

रात्री ८ वाजता : नेपाळ मृतांची संख्या ५०५७ वर पोहचली आहे

दुपारी 1 वाजता : नेपाळमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय.त्यामुळं मदतकार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नेपाळमधील मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिलीय. कोइराला म्हणाले, 'सरकार चांगलं काम करतंय पण बचावकार्य करणं खूप चॅलेंजिंग आहे. नेपाळसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे.'

माउंट एव्हरेस्टवरून आतापर्यंत २०० गिर्यारोहकांचा बचाव करण्यात आलाय. 

वातावरण स्वच्छ झाल्यामुळं बचावकार्याला वेग येण्याची शक्यता...मृतांचा आकडा ४३५२ वर... प्रभावी मदतकार्य होत नसल्याचं नेपाळच्या पंतप्रधानांनी केलं मान्य... 

आज पुन्हा हादरा २८ एप्रिल २०१५ -

नेपाळला पु्न्हा एकदा भूकंपाचा धक्का बसलाय. पहाटेच्या वेळी हा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ इतकी होती. शनिवारी सर्वात प्रथम दुपारी ७.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का नेपाळला बसला. त्यानंतर सतत तीन दिवस नेपाळला भूकंपाचे धक्के बसतच आहेत. त्यात आज पहाटेच पुन्हा नेपाळला भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे तिथले नागरिक कमालीचे घाबरुन गेलेत. नेपाळमध्ये आतापर्यंत भूकंपात मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4 हजारांपलीकडे गेलाय. 

नेपाळ भूकंपातील मृतांचा आकडा आता ३७२५ वर गेलाय. दरम्यान, लोकसभेत विरोधक आणि सरकारकडून भूकंपाबद्दल निवेदन सादर केलं गेलं. यात सरकारतर्फे राजनाथ सिंहांनी माहिती दिली. 

- सर्व खासदार एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देणार आहेत. 
- परदेशी पर्यटकांच्या व्हिसाची सोय करणार- राजनाथ सिंह
- अन्न, पाणी तसेच वैद्यकीय सुविधा नेपाळमध्ये पोहचवल्या - राजनाथ सिंह
- पंतप्रधानांनी तातडीने बैठक घेतली, नेपाळला शक्य ती मदत सुरु - राजनाथ सिंह
- भूकंपात बिहारमधील मृतांचा आकडा ५६ - राजनाथ सिंह
- भूकंपात भारतातील मृतांचा आकडा ७२ वर - राजनाथ सिंह
- संकट काळात इतर देशांच्या नागरिकांनाही भारतात आसरा देणार - राजनाथ सिंह
- पंतप्रधानांनी भूकंपग्रस्तांना मदत करताना तत्परता दाखवली - राजनाथ
- संकटसमयी भारत सरकार भारतीय तसेच नेपाळी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं- राजनाथ सिंह

डबेवाल्यांनी श्रद्धांजली वाहिली

नेपाळ भूकंपातील मुत्युमुखींना मुंबईच्या डबेवाल्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

संसदेत श्रद्धांजली

नेपाळमधील भूकंपानंतर नेपाळ आणि भारतात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना संसदेच्या दोन्ही सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी भूकंपावर आपआपली निवेदन सादर केलीत.

नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपामध्ये आतापर्यंत ३,२१८ जणांचा बळी गेलाय. तर ६,५००हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारत आणि चीनमधील ९० नागरिकांचाही समावेश आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्यात पावसामुळं मोठा अडथळा निर्माण होतोय. 

सकाळी ८.३६ वाजता - २७ एप्रिल २०१५

आतापर्यंत भारतीय वायुदलानं १९३५ भारतीय प्रवाशांची काठमांडूवरून सुटका केलीय. तब्बल १२ फेऱ्यांच्या सहाय्यानं भारतीय प्रवासी मायदेशी परतलेत. 

भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये १२.४३ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर दिल्ली मेट्रो सेवा थांबवण्यात आली. ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसलेत. नेपाळमधील भूकंपातील  बळींचा आकडा वाढतच असून २२०० पर्यंत पोहोचलाय.

मदत जाहीर

भारतात भूकंपामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत केंद्र सरकारनं जाहीर केलीय. पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिलीय. 

पुन्हा हादरे

नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपानंतर याभागात सौम्य धक्के अद्यापही सुरुच आहेत. आज पहाटेही याभागात भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला असून त्याची तीव्रता ४.५ रिस्टर स्केल इतकी होती. दरम्यान आणखी काही दिवस असे सौम्य हादरे जाणवतील असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

मृतांचा आकडा वाढला 
नेपाळला काल बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी एका क्षणात होत्याचं नव्हतं केलंय. या नैसर्गिक आघातात आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांचा आकडा १९०० इतका झालाय. पीटीआय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीय. दरम्यान भूकंपाची तीव्रता पाहता हा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. भूकंपामुळे नेपाळमधल्या दळणवळण तसंच पायाभूत सुविधांचं अतोनात नुकसान झालंय. तरीही युद्धपातळीवर नेपाळमध्ये बचाव तसंच मदतकार्य सुरु आहे. 

जगभरातले सुमारे तीन लाख नागरिक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती मिळतेय. या नागरिकांना त्यांच्या मायदेशात परत आणण्याचं कामही, संबंधित देशांकडून सुरु आहे. भारत सरकारचेही भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन मैत्री या नावानं भारतीय लष्कराकडून हे बचावकार्य सुरु आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या नेतृत्वाखाली हे बचावकार्य सुरु आहे. 

फूटव्हॅली या खेळाचा सामना खेळायला गेलेले भारतीय खेळाडू सुखरूप

नेपाळमध्ये फूटव्हॅली या खेळाचा सामना खेळायला गेलेल्या भारतीय खेळाडूंना सुखरुप भारतात परत आणण्यात आलंय. 

आतापर्यंत नेपाळमध्ये १८०० जणांचा भूकंपामुळे मृत्यू झालाय. ८० वर्षातील हा नेपाळमधील सर्वात भयंकर भूकंप आहे. भारताकडून मदतीचा हात देण्यात आलाय. भारतीयांना सुखरुप आणण्याचं कार्यही सुरू आहे. आतापर्यंत वायुदलानं ५४० भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलंय. 

वायुदलाची कामगिरी - भारताचं ऑपरेशन 'मैत्री'

वायुदल अप्रतिम कामगिरी करत आहे. 10 पेक्षा जास्त Mi - 17 हेलीकॉप्टर नेपाळमध्ये दाखल.
3C - 17 मालवाहू विमानं आणि 3 IL - 76 मालवाहू विमानं तैनात

रविवार दिनांक २६ एप्रिल २०१५- सकाळी ८.३० वाजता - महाराष्ट्र

- काठमांडूला फिरायला गेलेल्या बीएमसीतील ३५ नर्स सुखरुप
- चौकशीसाठी पुण्याचे दोन कॉन्स्टेबल नेपाळला गेले होते. 
- मुंबईतील १०० लोकं लग्नाला नेपाळला गेले होते. काठमांडूला ग्रँड हयात इथं लग्न होतं. 
- ट्रॅकिंगसाठी गेलेले १२ लोक बेपत्ता, अद्याप माहिती मिळाली नाही.
- महाराष्ट्रातील १५ जणांना दिल्लीत आणले
- महाराष्ट्रासाठी ५ फ्लाईट्स आल्या
- एकूण ६२ जण आले आहेत
- काही जणांना मुंबईला पाठवले
- केसरी टूर्सचे २८ लोक सुखरूप
- केसरी टुर्सच्या प्रवाशांना मुंबईला पाठवले

गोशाला इथं मराठी लोक अडकले आहेत, १५० लोक अडकले आहेत. पशुपतीनाथ जवळ गोशाला आहे. मुंबईतील अमित चौक्सी आणि ४ जण बेपत्ता... चिंतवन इथं गेले होते.

नेपाळ आणि भारताच्या अनेक राज्यांना आज दुपारी ७.९ रिश्टर स्केलचा भूंकपाने जबरदस्त हादरा दिला. नेपाळमध्ये या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे काही सेकंदाच शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यात. रॉयटर वृत्त संस्थेनेनंतर नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मृतांचा आकडा १५०० झाला आहे. नेपाळचा सुप्रसिद्ध धरहरा मनोरा कोसळला तर वर्ल्ड हेरिटेज असलेल दरबार स्वेअर हा मंदिर परिसरही जमीन दोस्त झाला आहे. भारतात मृतांचा आकडा ४७ पर्यंत गेला आहे. 

नरेंद्र मोदी यांची तातडीची बैठक 
भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली गेली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतरही कॅबिनेट मंत्री आणि अती वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. भूंकपामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेऊन, युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे आदेश आधीचं केंद्रानं दिले आहेत. दरम्यान बचाव आणि मदतकार्य तत्परतेनं पोहोचवणं, तसंच परिस्थितीचा एकंदर आढावा या महत्त्वाच्या बैठकीत घेतला गेला. आवश्यक ते सर्व उपाय तातडीनं करण्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिलीय. तर संकटसमयी नेपाळच्या जनतेसोबत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय... संसदेच्या बालयोगी सभागृहात आयोजित ज्ञानपीठ पुरस्कार वितरण सोहळ्यात मोदींनी नेपाळप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या... 

बाबा रामदेव बालबाल बचावलेत

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपावेळी योगगुरु बाबा रामदेव बालबाल बचावलेत... एका कार्यक्रमासाठी बाबा रामदेव नेपाळमध्ये आले होते.. यावेळी मंडपातून बाहेर आल्यानंतर भूकंपाचे हादरे बसले... त्यामुळं बाबा रामदेव थोडक्यात बचावले.

पशुपतिनाथ मंदिर सुरक्षीत 
नेपाळमधला काठमांडूचा प्रसिद्ध धरहरा टॉवर भूकंपानं जमीनदोस्त झालाय... पर्यटकांचं प्रमुख आकर्षणाचं केंद्र असलेली ही इमारत, भूकंपाच्या हादऱ्यानं भुईसपाट झाली आहे. या इमारतीखाली किमान 400 जण अडकले असण्याची भीती व्यक्त होतेय. यामध्ये पर्यटकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे... दररम्यान भूकंपाच्या या नैसर्गिक आपत्तीतही प्राचिन पशुपतिनाथ मंदिर मात्र सुरक्षीत आहे.

भूकंपात स्वीमिंग पूलचे पाणी कसे उसळते पाहा - सीसीटीव्हीत 

 

रात्री ९.४५ वाजता :नेपाळमध्ये पुढील तीन दिवस बीएसएनएल नेटवर्कवरून केलेल्या दूरध्वनीसाठी स्थानिक दर आकारण्यात येणार 

- तर एअरटेलने नेपाळमधील कॉल मोफत करण्याचा पुढाकार घेतला आहे. 

- नेपाळमध्ये मृतांचा आकडा १५०० आणि भारतात ४७ 

नेपाळमधील भूकंपाचे सीसीटीव्ही फूटेज

 

रात्री ८.३१ वाजता : नेपाळमध्ये मृतांचा आकडा ८७६ झाला आहे. भारतात मृतांचा आकडा ४१पर्यंत गेला आहे. 

सायं ७.५५ वाजता :  भारतीय हवाई दलाचे विमान २५० भारतीयांना  घेऊन नेपाळमधून रवाना - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून दिली माहिती

सायं ७.५४ वाजता : 

नेपाळमध्ये पुढील तीन दिवस बीएसएनएल नेटवर्कवरून केलेल्या दूरध्वनीसाठी स्थानिक दर आकारण्यात येणार

सायं ७.१५ वाजता : 
उत्तर भारतातल्या भूकंपाचा फटका बिहारलाही बसलाय. भूकंपामुळे दरभंगा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झालाय. युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असल्याची माहि्ती, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलीय.

Media preview
भारताच्या हिंडन एअरबेसवरून नेपाळसाठी मदत पाठविण्यात आली

सायं ६.४८ वाजता : एव्हरेस्ट बेस कॅम्पमधून १८ मृतदेह बाहेर काढले

- तिबेटमध्ये भूकंपात पाच जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

सायं ६.४६ वाजता : नेपाळ मृतांचा आकडा ७५८ वर, भारतात ३६ 

- नेपाळमध्ये मृतांचा आकडा ७५८ झाला आहे.

भूकंपामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं मदतकार्य यंत्रणा स्थापन केली आहे. या मदतकार्याची जबाबदारी केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान नुकसानग्रस्तांना युद्धपातळीवर मदत पोहोचवण्यचं कार्य हाती घेण्यात आल्याचं, राजीव प्रताप रुडी यांनी सांगितलंय. 

नेपाळमधल्या भूकंपामुळे तिथलं जनजिवन पुरतं विस्कळीत झालंय. तर भारतानं नेपाळला जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे. एअर इंडियासह, खासगी विमान कंपन्यांनी आपली नेपाळकडची उड्डाणं या नैसर्गिक आपत्तीनंतर थांबवली आहेत. नेपाळच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळत नाही तोपर्यंत, ही विमानसेवा स्थगित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झालंय.. यात माऊंट एव्हरेस्टवर गेलेल्या अनेक पर्यटकांचा संपर्क तुटला असून अनेक पर्यटक बेपत्ता झालेत.. तर नेपाळमध्ये महराष्ट्रातले अनेक पर्यटक अडकून पडलेत. नाशिकचे 80 पर्यटक यामध्ये आहेत... नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीच्या दोन बसच्या माध्यमातून शंभर पर्यटक नेपाळ भ्रमंती साठी गेले होते. त्यातील एक बस काठमांडू जवळ अडकली आहे. मोबाईल टॉवर तुटल्यान पर्यटकांशी संपर्क होऊ शकत नसला तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन यांनी दिली. झी मीडियाला दिलीय

 

सायं ६.०० वाजता : मृतांचा आकडा ७११ वर

- नेपाळमध्ये मृतांचा आकडा ७११ झाला आहे.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे काही लाइव्ह व्हिडिओ 

 

 

- नेपाळ भूकंपाने कसा हादरा बसला याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. पाहा कशी हादरते जमीन... 

 

सायं ५.०८ वाजता : मृतांचा आकडा ६८८ वर

रॉयटर वृत्त संस्थेनेनंतर नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मृतांचा आकडा ६८८झाला आहे. 

 

सायं ५.०१ वाजता : महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील १२५ प्रवासी अडकले

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात महाराष्ट्र आणि तेलंगणा यातील १२५ प्रवासी अडकले असल्याची माहिती एनआयने दिली आहे. या संदर्भात भारतीय हवाई दलाचे दोन विमान बचाव कार्यासाठी रवाना झाली आहेत. 

 

सायं ५.०० वाजता : मृतांचा आकडा ६०० वर

- रॉयटर वृत्त संस्थेनेनंतर नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मृतांचा आकडा ६०० झाला आहे.

Media preview
भूकंपाचा केंद्रबिंदू

 

Media preview
नेपाळची राजधानी काठमांडू येथे जखमींना उपचारासाठी नेताना नागरिक

 

दुपारी ४.३० वाजता : मृतांचा आकडा ४४९ वर

- रॉयटर वृत्त संस्थेनेनंतर नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मृतांचा आकडा ४४९ झाला आहे.

दुपारी ३.४५ वाजता : मृतांचा आकडा १०० वर

नेपाळमध्ये भूकंपानंतर मृतांचा आकडा १५० वर गेलाय. भारतातही आणखी ३ जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. भारतात एकूण ५ जण दगावलेत. बाराबंकीमध्ये दोघांचा तर सीतामढीमध्ये तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 

माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहक बेपत्ता

नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता जास्त असल्यानं मोठी जीवितहानी झालीय. दरम्यान, माऊंट एव्हरेस्टवर अनेक गिर्यारोहक गेले असल्याची माहिती मिळतेय आणि त्या गिर्यारोहकांशी कोणताही संपर्क होत नाहीय. नेपाळमध्ये संपर्क साधण्यासाठी काही फोन नंबर जारी करण्यात आलेत. 

नाशिकमधील पर्यटक सुखरूप

भारतातील अनेक पर्यटक नेपाळमध्ये असण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. नाशिकमधून नेपाळला गेलेले जवळपास ८० पर्यटक सुखरुप असल्याची माहिती मिळतेय.

बिहारच्या दरभंगामध्ये भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेश सरकारनं भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना २ लाखांची, तर जखमींना २० हजारांची मदत जाहीर केलीय. 

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरसह उत्तर आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सुमारे ११.४४ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेत. उत्तर पूर्व राज्यामध्ये भूकंपाचा सर्वाधिक परिणाम झाला. जवळपास १ मिनीटं भूकंपाचे धक्के जाणवले. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा १२.१९ मिनीटांनीही दिल्लीत भूकंपाचे दुसऱ्यांदा धक्के जाणवले. तर नागपूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. 

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, लखनऊ, नोएडा, कोलकाता, बिहारमध्येही धक्के जाणवले. नागरिक घरातून आणि ऑफिसमधून बाहेर पडले आहेत. भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली असून नेपाळमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. काठमांडूपासून ८० किलोमीटर दूर लामजुंगमध्ये भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जातंय. 

मेट्रोसेवा थांबविण्यात आलीय. अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती मिळाली नाहीय. मात्र नेपाळमध्ये अनेक राज्यांमध्ये इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून आपण भूकंपाविषयीची माहिती घेत असल्याचं म्हटलंय. 

We are in the process of finding more information and are working to reach out to those affected, both at home & in Nepal.

— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2015

News has come in about an Earthquake in Nepal. Several parts of India also experienced tremors.

— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2015

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.