श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव

FIR Against Shreyas Talpade and Aloknath: अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल...

दिक्षा पाटील | Updated: Jan 24, 2025, 11:27 AM IST
श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव title=
(Photo Credit : Social Media)

FIR Against Shreyas Talpade and Aloknath: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. ही FIR सोनीपतमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे इंदूरमध्ये रजिस्टर करण्यात आलेल्या एका सोसायटीच्या 50 लाखांपेक्षा जास्त लोकांची कोटींचे रुपये घेऊन पळणाऱ्या कंपनीचं प्रमोशन हे कारण आहे. या FIR मध्ये हरियाणाच्या सोनीपतमध्ये दाखल करण्यात आली आहे.

श्रेयस आणि आलोकनाथ हे दोघे बॉलिवूड सेलिब्रिटी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रमोशन करत होते. तर सोनू सूदनं देखील या कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. तर पोलिसांकडे दाखल केलेल्या FIR मध्ये या कंपनीनं 6 वर्ष लोकांकडून पैसे जमा केले. लोकांनी फिक्स्ड डिपॉजिट (FD) सोबत दुसऱ्या पद्धतीनं पैसे जमा करत मोठ्या प्रमाणात रिटर्न देण्याचं वचन दिलं आहे. इतकंच नाही तर लोकांना विश्वास जिंकण्यासाठी महागडे आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार ठेवले आणि मल्टीलेवल मार्केटिंग केल्यानं पैसे मिळतील असं आमिश दाखवलं. असं म्हटलं जातं की सुरुवातीला कंपनीमध्ये काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यावधी रुपये जमा झाले त्यानंतर सगळं काही बदललं. आता कंपनी पैसे द्यायला पुढे मागे विचार करते आणि जेव्हा लोकांनी पैसे मागितले तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाइल बंद केला. 

कंपनीनं 2023 मध्ये कंपनीचा स्कॅम हळू-हळू समोर आला. मोठे दावे आणि आमिश दाखवत कंपनीला जे काही करायचं होतं ते सगळ्यांपासून लपवून ठेवलं. जेव्हा लोकांनी त्या सोसायटीच्या लोकांवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली त्यानंतर सोसायटीच्या मालकानं सगळ्या एजंट आणि गुंतवणूक करणाऱ्यांशी संबंध तोडले. जेव्हा लोकं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर सगळे कनेक्शन बंद केलं. जेव्हा लोकं त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ऑफिसला टाळा लावून त्यांनी पळ काढला. अधिकारी कर्मचारी हे कोटींची रक्कम घेऊन फरार झाले. 250 हून अधिक सुविधा केंद्रे होती जी एजंट्सद्वारे चालवली जात होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाइन पद्धतीने काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावे आहेत.

हेही वाचा : 23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे

पानिपत सारख्या काही मोठ्या शहरांमध्ये सोसायटीच्या चेस्ट ब्रॉन्च सुरु केल्या. काही शहरांमध्ये सोसायटीनं स्वतःची रुग्णवाहिका सेवा तसेच मोबाईल एटीएम व्हॅन सुरू केल्या. या प्रकरणात 25 जानेवारी रोजी कोर्टात सुनावनी होणार आहे.