www.24taas.com, झी मीडिया, भूज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात सास-बहू-दामाद असं चित्र दिसत आहे. सिमेवर लढणाऱ्या जवानांना लाल किल्ल्यावरून धीर देण्यात आलेला नाही, येथेच त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय, अशी टीका मोदी यांनी गुजरातमधील भूज येथे महाविद्यालयातील भाषणात केली.
पंतप्रधानांनी भाषणात पाकिस्तानला कडक शब्दात का सुनावलं नाही? भ्रष्टाचाराबद्दल मौन का बाळगलं? पंतप्रधानांच्या भाषणातही दिसली घराणेशाहीच दिसली आहे. पंतप्रधानांच्या भाषणात घराणेशाहीबरोबरच सास बहू दामाद यांचाच उल्लेख होता असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांना त्यांच्याच पक्षाच्या लालबहाद्दूर शास्त्री आणि सरदार पटेल यांचा विसर पडला का, असा सवाल त्यांनी विचारला.
अन्नसुरक्षा विधेयकाबाबत पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला. गरिबी हटवण्याबाबत सरकारचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. तर गरिबाच्या थाळीत अन्न नव्हे तर अॅसिड टाकल्याची टीका मोदींनी केली.
गुजरातचा विकास गुजरातच्या जनतेमुळेच झाला आहे. देशाच्या विकासात गुजरातचा वाटा मोठा आहे. देशाने गुजरातचा आदर्श घ्यायला पाहिजे. मात्र, पंतप्रधान तो घेत नाही. देशाला आज नव्या उमेदीची, नव्या विचारांची गरज आहे. विकाससाठी ज्या योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळायला हवा. तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर विकासाशी करा, असा सल्ला मोदींनी यावेळी दिला.
गुजरातनं देशाला अनेक वीरपुत्र दिले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात आपले जवान मृत्यू पडत आहेत. पाकला चोख उत्तर देण्याची गरज आहे. मात्र, लाल किल्ल्यावरून सैन्याला धीर देण्याची गरज होती, पण तसं झालं नाही. पंतप्रधानांच्या भाषणाने निराशा केली. देशाची सुरक्षा रामभरोसे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि त्यांचे नातेवाईकही भ्रष्टाचारी आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वप्नच पूर्ण झालेली नाहीत. सरकारला गरिबांची चिंता नाही. त्यामुळे जनतेचा सरकारवरचा विश्वास उडालाय आहे, असे मोदी म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.