www.24taas.com, झी मीडिया, भूज
गुजरातच्या भूजमधल्या लालन कॉलेजमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे आहेत. यावेळी 'लालन'वरून केलेल्या भाषणातून मोदींचं लक्ष लाल किल्ल्याकडे लागल्याचं स्पष्ट दिसून आलं.
'स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतील तेव्हा त्यांच्या आणि माझ्या भुज इथल्या भाषणाची नक्कीच तुलना होईल' असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये भाजपच्या पंतप्रधान पदाच्या या उमेदवाराच्या भाषणाची उत्सुकता वाढली होती.
पाहुयात मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...
* देशाला आज नव्या उमेदीची, नव्या विचारांची गरज
* देशाची सुरक्षा रामभरोसे
* केंद्रात 'सास, बहू आणि दामाद'ची सीरियल सुरू...
* सत्ताधारी आणि त्यांचे नातेवाईकही भ्रष्टाचारी
* 'दिल्ली, गुजरातचा मुकाबला होऊन जाऊ द्या...'
* देशाच्या विकासात गुजरातचा वाटा मोठा
* गुजरातमध्ये सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती
* गुजरातमध्ये आता एकूण ३३ जिल्हे
* पंतप्रधानांनी आपल्या भाषणात चीनचा मुद्दा टाळला
* विकास योजनांचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळायला हवा
* आजच्या पंतप्रधानांचं भाषण हे देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या पहिल्या भाषणाप्रमाणेच होतं - मोदी
* गुजरातचा विकास गुजरातच्या जनतेमुळेच
* सर्वात कमी बेरोजगार गुजरातमध्ये
* स्पर्धा करायचीय तर विकासाशी करा, मोदींचा सल्ला
* गुजरातनं देशाला अनेक वीरपुत्र दिले
* मोदींनी केलं लालकृष्ण आडवाणींचं कौतुक
* देशाला आता घराणेशाहीपासून मुक्ती हवीय
* सरकारला गरिबांची चिंता नाही
* जनतेचा सरकारवरचा विश्वास उडालाय
* स्वातंत्र्यानंतर स्वप्नच पूर्ण झाली नाहीत
* काँग्रेसनं संसद बंद पाडल्याचा आरोप
* सहनशक्तीच्याही मर्यादा असतात
* पंतप्रधानांच्या भाषणाने केली निराशा - नरेंद्र मोदी
* पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकला ठणकावयला हवं होतं, त्यांच्या भाषणात काहीही दम नव्हता
* लाल किल्ल्यावरून सैन्याला धीर देण्याची गरज होती, पण तसं झालं नाही
* पंतप्रधानांच्या भाषणातून प्रेरणा मिळत नाही, लोकशाहीसाठी हे दुर्दैवाचं
* राष्ट्रपतींच्या भाषणातही वेदनाच जाणवल्या
* राष्ट्रपतींच्या भाषणाचा दिला संदर्भ
* लष्काराचं मनोबल उंचावण्याची गरज आहे
* भ्रष्टाचारावर नियंत्रणाची गरज
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.