नरेंद्र मोदी सरकार जनतेला मोठे गिफ्ट देण्याच्या विचारात

नरेंद्र मोदी सरकार आता जनतेला मोठा गिफ्ट देण्याच्या विचारात आहे, यूनिवर्सल बेसिक इनकम योजना लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2017, 04:27 PM IST
 नरेंद्र मोदी सरकार जनतेला मोठे गिफ्ट देण्याच्या विचारात title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार आता जनतेला मोठा गिफ्ट देण्याच्या विचारात आहे, यूनिवर्सल बेसिक इनकम योजना लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. या सिस्टीमनुसार सरकार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम देणार आहे, त्या नागरिकाकडे रोजगार असो किंवा नसो.

 या द्वारे सरकार नागरिकांमध्ये आर्थिक स्वरूपात एक सुरक्षित वातावरण तयार करू इच्छीत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या बजेटमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकार जानेवारीच्या शेवटी एक रिपोर्ट जारी करणार आहे, ज्यात या योजनेविषयी सांगण्यात येईल. या योजनेला लागू करण्याआधी सरकारने ही योजना तीन ठिकाणी लागू केली होती. 

२०१० मध्ये ही योजना सर्वात आधी मध्य प्रदेशात लागू करण्यात आली होती. सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर ही योजना दुसऱ्या पंचायतीत लागू करण्यात आली. यानंतर पश्चिम दिल्लीच्या एका भागात ही योजना लागू करण्यात आली.

पायलट प्रोजेक्टनुसार या तीनही जागी महिला आणि पुरूषांना ३०० आणि लहान मुलांना १५० रूपये दिले गेले, या तीनही ठिकाणी या योजनेचे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.