राहुल गांधींनी युपीएचे नेते व्हावं- मनमोहन सिंग

युपीएवर जनता पुन्हा विश्वास दाखवेल आणि युपीए तिस-यांदा सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त कलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 17, 2013, 08:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
युपीएवर जनता पुन्हा विश्वास दाखवेल आणि युपीए तिस-यांदा सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त कलाय. तसंच राहुल गांधी यांनी युपीएच्या नेतेपदाची जबाबदारी सांभाळावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.
राहुल यांनी सध्या आपण सांभाळत असलेली म्हणजेच पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी, असंही पंतप्रधांनी म्हटलय. मंत्रिमंडळ फेरबदालंनतर ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
जनता सर्व जाणते, आणि जनताच योग्य तो निर्णय करेल, असं सांगत नरेंद्र मोदींबाबतही पंतप्रधानांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसंच एनडीएतून बाहेर पडललेले नितिश कुमार हे सेक्युलर असल्याचंही मनमोहन सिंग यांनी म्हटलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.