चटपटीत, चमचमीत 'मॅगी'वर येणार बंदी!

मुलांना भूक लागली की, झटपट आणि चमचमीत 'मॅगी' खाण्यावर भर दिला जातो. अनेक घरांत आई आपल्या बाळाला 'मॅगी' देते. मात्र, हीच 'मॅगी' आरोग्याला खातक ठरत आहे. त्यामुळे या 'मॅगी' वर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Updated: May 19, 2015, 06:25 PM IST
चटपटीत, चमचमीत 'मॅगी'वर येणार बंदी! title=

नवी दिल्ली : मुलांना भूक लागली की, झटपट आणि चमचमीत 'मॅगी' खाण्यावर भर दिला जातो. अनेक घरांत आई आपल्या बाळाला 'मॅगी' देते. मात्र, हीच 'मॅगी' आरोग्याला खातक ठरत आहे. त्यामुळे या 'मॅगी' वर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

'मॅगी'मध्ये तब्येतीला हानिकारक पदार्थ आढळून आल्याने या उत्पादनाचा परवाना रद्द करण्याची शिफारस केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागातील मॅगीचे नमुने तपासले असता, त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिशाचं प्रमाण अधिक आढळून आले. 

पॅकबंद मॅगीनं एमएसजी आणि शिशाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त केल्याचे तपासातून समोर आले आहे. या दोन्ही घटकांचं अतिरिक्त सेवन तब्येतीला घातक ठरू शकतात, त्याचे साइड-इफेक्ट्स होऊ शकतात. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन, लखनऊच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही माहिती केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) कळवली आहे. त्याचवेळी  'मॅगी'चा परवाना रद्द करून देशात 'मॅगी'च्या विक्रीवर बंदी आणावी, अशी शिफारसच त्यांनी केली आहे.

दरम्यान, मॅगी उत्पादन करणाऱ्या नेस्ले कंपनीनं आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. एमएसजीचा वापर आपण मॅगीमध्ये करतच नाही आणि शिसंही निर्धारित प्रमाणापेक्षा कमीच वापरत असल्याचा त्यांचा दावा आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.