'स्पाइसजेट'चं तिकीट मिळवा हजार रूपयात

 'स्पाइसजेट' विमानांच्या तिकीटांची विक्री १ हजार १० रूपयांपासून सुरू होणार आहे. ही तिकिट २१ मे मध्यरात्रीपासून बुक करता येतील. 'स्पाइसजेट' कंपनीच्या विमान सेवेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Updated: May 19, 2015, 03:52 PM IST
'स्पाइसजेट'चं तिकीट मिळवा हजार रूपयात title=

नवी दिल्ली :  'स्पाइसजेट' विमानांच्या तिकीटांची विक्री १ हजार १० रूपयांपासून सुरू होणार आहे. ही तिकिट २१ मे मध्यरात्रीपासून बुक करता येतील. 'स्पाइसजेट' कंपनीच्या विमान सेवेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

ही सवलत मर्यादित जागांसाठी असल्याने 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड' आधारावर तिकीटांचे वाटप करण्यात येणार आहे.  या सवलतीदरम्यान तुम्हाला एक जुलै ते १५ ऑक्टोबर दरम्यानच्या प्रवासासाठी तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. 

'स्पाइसजेट'च्या पहिल्या विमानाने २००५ मध्ये नवी दिल्ली ते अहमदाबाद उड्डाण केले होते. या उड्डाणाला २३ मे रोजी दहा वर्षे पूर्ण होतील. 'स्पाइसजेट'ची ही सवलत फक्त सर्व प्रकारच्या देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू आहे. आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही सवलत लागू होणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.