मोदी सरकारची दिल्लीत निघाली 'वरात'

नरेंद्र मोदी सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्याने, युवक काँग्रेसकडून आज निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढत, युवक काँग्रेसने निषेध नोंदवला.

Updated: May 26, 2015, 04:55 PM IST
मोदी सरकारची दिल्लीत निघाली 'वरात'  title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्याने, युवक काँग्रेसकडून आज निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढत, युवक काँग्रेसने निषेध नोंदवला.

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसकडून देशभर सरकारवर टीका करण्यात येत आहे. दिल्लीसह विविध शहरांत काँग्रेसने आंदोलने करत सरकारच्या धोरणांचा विरोध केला आहे. 

काँग्रेसने दिल्लीत सरकारची काढलेली वरात रस्त्यावरून जात असताना वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सरकारच्या विविध घोषणांचे फलक घेऊन कार्यकर्ते या वरातीत सहभागी झाले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.