हाताची बोटं सांगतात स्वभावाची गुपितं, प्रत्येक बोट उलगडतं तुमच्या व्यक्तीमत्वाचे पैलू

Personality By Finger Shape: ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याच्या शरीररचनेवरुनही ओळखता येतो. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 21, 2025, 12:40 PM IST
हाताची बोटं सांगतात स्वभावाची गुपितं, प्रत्येक बोट उलगडतं तुमच्या व्यक्तीमत्वाचे पैलू title=
Your Finger Shape Reveals Your Hidden Personality Traits

Personality By Finger Shape: एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येण्यासाठी बराच काल जावू द्यावा लागतो. त्याच्यासोबत वेळ व्यतित केल्यानंतर त्याचं व्यक्तीमत्व कसं आहे याची आपल्याला अंदाज येतो. पण आपल्या शरीराची ठेवणदेखील व्यक्तीमत्वाचा अंदाज बांधण्यास पुरेसी असते. तुम्हाला माहितीये का हाताची बोटंदेखील तुमच्या स्वभाचे पैलू उलगडतात. हे एक प्राचीन विज्ञान असून त्याला हस्तरेखा विज्ञान किंवा पामिस्ट्री असंदेखील म्हटलं जातं. हातांची बोटं तुमची मानसिकता आणि स्वभाव दर्शवतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

बोटांची स्थिती तुमची मानसिकता सांगते?
तुमच्या बोटांची स्थिती आयुष्याबबात बरंच काही सांगून जाते. काही लोकांची होटं सरळ आणि परफेक्ट असतात. अशी लोक त्यांच्या आयुष्यात संतुलित असतात. तसंच, ज्यांची बोटं थोडी झुकलेली असतात ते त्यांच्या आयुष्यात असंतुलीनता सामना करत असतात. बोटांची स्थिती पाहून तुम्हाला तुमचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यास मदत मिळेल. 

झुकलेली बोटं

जर तुमची बोटं एकमेकांकडे झुकलेले आहेत तर तुमचा स्वभाव लवचीक म्हणजेच सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणारा आहे. तसंच, जर तुमची इतर बोटं मध्यमाकडे झुकलेली असतील तर याचा अर्थ तुमच्या स्वभावात धैर्य आणि समजूतपणा आहे. तुम्ही परिस्थितीनुसार समस्येचे समाधान शोधण्यास माहिर असतात. 

अनामिका 

रिंग फिंगर म्हणजेच अनामिका या बोटाचा आकारदेखील तुमचं व्यक्तीमत्व दर्शवतो. जर हे बोट सरळ आणि लांब असेल तर संकेत आहे की तुमचं आर्थिक भविष्य उज्वल असेल. अशा व्यक्तीकडे कधीच धन संपत्तीची कमतरता नसते. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत राहते. 

तर्जनी
तर्जनी जर आंगठ्याच्या बाजूने झुकलेली असेल तर हा संकेत आहे की तो व्यक्ती अहंकाराने वेढलेला आहे. त्या व्यतिरिक्त तर्जनी मध्यमा बोटाकडे झुकलेली असेल तर याचा अर्थ हा व्यक्ती मनमौजी असून दुसऱ्यांशी बोलण्यास ते संकोच करत नाहीत. 

मध्यमा 
मध्यम बोट कुठेही झुकलं असेल तर हा संकेत आहे की, तुम्ही खूप गंभीर स्वभावाचे आहेत. तुम्ही कोणतंही काम विचारपूर्वक करतात आणि पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घेतात. 

करंगळी

करंगळीचा आकार देखील तुमचा स्वभाव सांगतो. जर करंगळी अनामिकाजवळ झुकलेली असेल तर त्याचा अर्थ तुमचा स्वभाव स्वार्थी असू शकतो. तसंच जर बोट बाहेरच्या बाजूने झुकलेले असेल तर तुम्ही आयुष्यासोबत जास्त गंभीर असू शकते. 
 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)