Gold Price Today: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी पार पडला त्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी आल्यानंतर सोनं-चांदीने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील बुलियंसला मजबुती आली असून घरगुती वायदे बाजारातही तेजी दिसून येत आहे.
मंगळवारी MCXवर सोन्यात 300 रुपयांपेक्षा जास्त तेजी दिसून आली आणि 78,900 रुपयांच्या जवळ ट्रेड करत आहे. चांदीत 700 रुपयांची मजबूती आली असून आता चांदी 92,140 रुपयांवर स्थिरावली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं $2740 जवळ पोहोचलं होतं. तर, चांदी $ 31च्या वर व्यवहार करत आहे. मागील एका महिन्यात सोन्याचा जवळपास 4 टक्के परतावा मिळाला आहे.
मागील महिन्यात 21 डिसेंबरमध्ये सोनं 76,420च्या आसपास ट्रेड करत होते. आता जानेवारीत सोनं 79,226 रुपयांपर्यंत सोनं पोहोचलं आहे. राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमध्ये सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे जानेवारीमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमती ३ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत आणि चांदीच्या किमती ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
आज सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ३८६ रुपयांच्या वाढीसह सुमारे ७८,९३० रुपयांवर व्यवहार करत होता. कालच्या व्यवहारात तो ७८,५४४ वर बंद झाला. या काळात चांदीचा भाव ७०८ रुपयांच्या वाढीसह ९२,१५० रुपये प्रति किलो होता, जो काल ९१,४४२ रुपयांवर बंद झाला होता.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 74, 500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 81, 230 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 61,000 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,450 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,123 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6, 100 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 59,600रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 64,984रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 48,800 रुपये
22 कॅरेट- 74, 500 रुपये
24 कॅरेट- 81, 230 रुपये
18 कॅरेट- 61,000 रुपये