लखनऊ : उन्नावमध्ये गंगेच्या परियार घाटाजवळ १०५ मृतदेहांचं गूढ वाढत चाललंय. मात्र या प्रकरणी आता एक धक्कादायक बाब उघड झालीय.
गंगेच्या प्रवाहात लहान मुलांचे आणि कुमारिकांचे मृतदेह सोडण्याची एक विचित्र आणि भीषण प्रथा उघड झालीय. परियार घाट परिसरातल्या स्मशानभूमीत दररोज पाच ते दहा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. त्यातील कुमार आणि कुमारिकांचे मृतदेह दहन न करता तसेच गंगेच्या कालव्यात सोडून देण्याची भयंकर प्रथा वर्षानुवर्षं चालत आलीय. त्यापैकीच १०४ मृतदेह बुधवारी परियर घाटाजवळ दिसले.
त्यामुळं गंगा शुद्धीकरण मोहिमेला अनिष्ट परंपरेचा खोडा बसलाय. याबाबत पोलीस आणि अधिकारी मात्र थातुरमातुर उत्तर देण्यात समाधान मानत असल्याचं समोर येतंय.
गंगा शुद्धिकरणात, स्वच्छता अभियानात सर्वात मोठा अडथळा ठरणा-या आणि मृतदेह पाण्यात सोडण्याच्या या प्रथेवर कुणीच काही बोलायला तयार नाही. त्यामुळं पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी आणि उमा भारती गंगेच्या या प्रदूषणाबाबत काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.