जनलोकपालवरुन दिल्ली विधानसभेत गदारोळ

जनलोकपाल विधेयकावरुन दिल्ली विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. जनलोकपाल गोंधळातच मांडण्यात आले. विधानसभा अध्यक्ष एम.एस.धीर यांची जनलोकपालवर चर्चा करण्याची परवानगी दिली. त्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत. त्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत गोंधळ घातला. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2014, 04:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जनलोकपाल विधेयकावरुन दिल्ली विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. जनलोकपाल गोंधळातच मांडण्यात आले. विधानसभा अध्यक्ष एम.एस.धीर यांची जनलोकपालवर चर्चा करण्याची परवानगी दिली. त्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत. त्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत गोंधळ घातला. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.
जनलोकपाल मंजूर करण्यासाठी आपचे सदस्य प्रयत्न करत आहेत तर, नायब राज्यपालांनी विधानसभाध्यक्षांना पाठवलेले पत्र जाहीर करावे यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांचा गोंधळ घातला. जोरदार हंगामा केला. कोणत्याही परिस्थिती जनलोकपाल बिल मांडू न देण्याचा त्यांनी निर्धार केला होता. मात्र, गोंधळातच हे बिल मांडण्यात आले.
जनलोकपाल घटनात्मक असले तर, त्याला आपण पाठिंबा देऊ असे काँग्रेस आणि भाजपने म्हटले आहे. या गोंधळामुळे याआधी विधानसभा तीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गोंधळानंतर विधानसभा तहकूब करण्यात आली आहे.
जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडण्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी हे विधेयक मांडण्यास विरोध करुनही आपने हे विधेयक विधानसभेत मांडले. जनलोकपाल विधेयक विधानसभेच्या पटलावर मांडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ही बाब लक्षात घेऊन हे विधेयक मांडण्याची परवानगी देऊ नये असे दिल्लीचे नजीब जंग यांनी दिल्ली विधानसभा अध्यक्ष एम.एस.धीर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे पत्र वाचून दाखविण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी ना मंजूर करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी जोरदार हंगामा केला आणि अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. दरम्यान, जनलोकपाल बिल पास न झाल्यास आपण मुख्यमंत्री पदाचा देण्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.